महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असलेली छावा मराठा योद्धा संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे… या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, गोरगरिबांना न्याय, महिलांवर होणारे अत्याचार अशा विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम छावा मराठा योद्धा संघटनेच्या मार्फत केले जाते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी छावा मराठा योद्धा संघटनेकडून रस्त्यावर उतरून आंदोलन व उपोषण करण्यात आली. अशा या संघटनेचे राज्यामध्ये सामाजिक क्षेत्रात नावलौकिक आहे. आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी महाड तालुक्यातील हॉटेल समृद्धी हॉलमध्ये आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. छावा मराठा योद्धा संस्थापक अध्यक्ष मुद्दसिर भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील व तालुक्यातील कार्यकारणीची निवड झाली. संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार रामदास चव्हाण यांची नव्याने निवड करण्यात आली. एक डॅशिंग आणि खंबीर नेतृत्व असलेल्या रामदास चव्हाण यांना नव्याने संधी दिली असता दिलेली जबाबदारी ही मोठी असून संघटनेसाठी अहोरात्र मेहनत करून संघटना मजबूत करण्याचे काम करीन असे जिल्हाध्यक्ष रामदास चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच छावा मराठा योद्धा संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नयनेश भालचंद्र दळी तर अरुण जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून महिलांना देखील प्राधान्य देण्यात आले यामध्ये महिला आघाडी कोकण अध्यक्षापदी शाहीन चिपळूणकर , जिल्हा अध्यक्षपदी नाझिया जहूर सुभेदार, जिल्हा उपाध्यक्षपदी दिपाली रणदिवे तर महाड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी रेश्मा माने यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी विनयकुमार रत्नपारखी, रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वहाब दळवी तसेच चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, माणगाव अशा अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदसिर भाई पटेल यांच्या स्वाक्षरीने सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले तसेच पद घेतलेल्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवा व सामाजिक क्षेत्रामध्ये जोमाने काम करा जर काही अडचण आली तर मी संस्थापक अध्यक्ष म्हणून सदैव तुमच्या पाठीशी असेल असे संस्थापक अध्यक्ष मुदस्सीर भाई पटेल यांनी या बैठकीदरम्यान सांगितले.