कोल्हारे येथील ट्रान्सफॉर्मरच्या तांब्याच्या तारा चोरीमुळे परिसरात खळबळ… सरपंचांकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल…

0
8

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंखे):- 

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेले त्रान्स्फॉर्मर मधील तांब्याच्या तारा मध्यरात्रीच्या सुमारास चोरीस गेल्या असून, यामुळे संपूर्ण हद्दीत पाणीपुरवठा खंडित झाला आहे… ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे…  ग्रामपंचायत कर्मचारी सकाळी पाणी चढवायला गेले असता त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी ही  बाब सरपंच विरले यांना सांगितली…

सरपंच महेश विरले यांनी घटना स्थळी पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी नियोजितपणे हा त्रान्स्फॉर्मर मधून फक्त ताब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत. त्यांनी लगेच नेरळ पोलीस ठाणे व महावितरण यांना खबर दिली. संबंधित वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यामुळे त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली…

नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे… परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असून सरपंच स्वतः पनवेल येथील महावितरण कार्यालयात गेले असून नवीन ट्रान्सफॉर्मर  बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत व नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे अवाहन केले जात आहे…