मायरा पोवारच्या वाढदिवसाने सोशल मिडिया ते प्रत्यक्ष घरी शुभेच्छांचा पूर !

0
14

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

खांदाड येथील लोकप्रिय युवा नेते महेश पोवार उर्फ बाळा डीजे यांच्या लाडक्या कन्या मायरा हिचा तिसरा वाढदिवस मंगळवारी ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी एकत्र आलेल्या असंख्य तरुणांच्या उपस्थितीच्यामुळे वातावरण उत्साहाने भरून गेले… तीन वर्षांची मायरा दिसायला गोंडस, चटकन मनात भरणारी आणि वयाच्या मानाने खूपच हुशार आहे. आपल्या वडिलांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या घरी नेहमीच तरुणांची वर्दळ असते, आणि त्या प्रत्येकाला मायरा आनंदाने सामोरी जाते. तिच्या गोड आणि बोलक्या स्वभावामुळे ती सर्व तरुणांची लाडकी ठरली आहे. वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या संख्येने आलेले तरुण पाहून मायराने सर्वांचे मनापासून स्वागत केले…  तिचा हसरा चेहेऱ्या मधून उमटलेली दृश्य हीच कृतज्ञता आणि परिपक्वता उपस्थितांना थक्क करून गेली… एका तीन वर्षांच्या मुलीकडून आलेल्या या साध्या पणामुळे सर्वांची मने जिंकली… यावेळी परिसरातील अनेक लहान मुले-मुली सुद्धा मायराच्या वाढदिवसासाठी उपस्थित होती… त्या सगळ्यांनी मायरासोबत खेळत, नाचत आणि हसतखिदळत वाढदिवसाचा आनंद लुटला. छोट्या छोट्या मित्रमैत्रिणींमध्ये रमलेली मायरा अगदी घरातील लाडक्या परीसारखी वाटत होती…

या आनंदसोहळ्यात मायराच्या आई सौ.  माहि महेश पोवार, आजी, काका आणि इतर नातेवाईकांनीही हजेरी लावली होती. केक कापणे, शुभेच्छा, भेटवस्तू, आशीर्वाद आणि प्रेमळ आलिंगनाणे हा संपूर्ण क्षण अविस्मरणीय ठरला… विशेष म्हणजे, महेश पोवार यांनी सोशल मिडियावर टाकलेला मायराच्या तिसरा वाढदिवस मात्र तितकाच महत्वाचा जो पहिला जन्मदिनाचा आनंद असतो कारण मायरा आता स्कूल गर्ल झाल्याने तिचा पहिलाच वाढदिवस थाठामाथात ज्या शाळेत शिकत असलेल्या खांदाड मधील इंग्रजी बालवाडी शाळा अर्थातच लिटिल केजी शाळेत साजरा झाला…

वाढदिवसाच्या उपक्रमाचे स्टेटस ठेवले आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली… त्यामुळे दिवसभरात नित्यनेमाने फोन कॉल्स, सोशल मीडिया मेसेजेस आणि प्रत्यक्ष घरी येऊन शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागलेली दिसून आली… वाढदिवस साजरा करताना घर सतत पाहुण्यांच्या उपस्थितीने गजबजले होते… मायरा आपल्या निरागस हास्याने आणि आपुलकीने सगळ्यांमध्ये रमली होती… तिचा स्वभाव असलेली सहजता आणि प्रेमळ वागणूक साऱ्यांच्या लक्षात राहिल… हा वाढदिवस केवळ एका मुलीचा नव्हता, तर तो एकत्रतेचा, प्रेमाचा आणि निरागसतेची आठवण करून देणारा क्षण मायराचा वाढदिवस तिच्या आयुष्यातील एक खास क्षण ठरला… आणि तिची लोकप्रियता म्हणजे ती आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येकाला आनंद देणारी एक टवटवीत व्यक्तिमत्त्व आहे, याचेच जिवंत उदाहरण ठरले…