रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
रायगड जिल्ह्यात काही दिवसापूर्वी रात्रीच्या अंधारात दरोडेखोरांकडून धुमाकूळ घातल्याची घटना रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात घडली होती.. याठिकाणी चार ते पाच चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आला होता…. कोयत्यांचा वापर करीत या चोरट्यांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकला असून, यामध्ये हजारो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस झाले होते… पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने याबाबत तपास करीत सहा आरोपींना पुणे खालापूर येथून ताब्यात घेतले आहे….
अजय एकनाथ चव्हाण ( वय-23, रा.आसरे, ता. खालापूर, जि. रायगड मुळ रा. खाडवे, ता. गेवराई, जि.बिड) पंजाबराव चव्हाण,( वय-20, रा.होराळे, पो. वावोशी, ता. खालापुर, मुळ रा. ससगाव, ता. फुलंबी, जि. छञपती संभाजी नगर), मल्हारी भानुदास चव्हाण, ( वय 30, रा. भिलवली, पो.चौक, ता.खालापूर, जि. रायगड मुळ रा.ढालगाव, ता. जामनेर, जळगाव), सुनिल प्रकाश चव्हाण, (वय 32, रा. भिल्लार वाडी, काजज, जि.पुणे मुळ रा.खावठी ता. गेवराई, बिड), सोमनाथ भानुदास चव्हाण, (वय 30, रा.भिलवली, पो. चौक, ता. खालापूर, जि. रायगड मुळ रा.ढालगाव, ता. जामनेर, जि.जळगाव ), सुजल महेश चव्हाण (वय-19, यशवंत नगर खोपोली, ता.खालापुर, मुळ रा.यवत, ता. इंदापुर, जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत…
याबाबत सुधागड तालुक्यातील गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष्य केले होते…. गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले… गावातील ग्रामस्थ त्यांच्या घरात शनिवारी (दि.26) जूलैला रात्री गाढ झोपेत होते… या संधीचा फायदा घेत काही टोळके रविवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास बंद दरवाजा तोडून गावातील एका घरात घुसले… अचानक झालेल्या हल्ल्याने घरातील सर्वमंडळी भयभीत झाली होती.
या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. हातोंड येथील चव्हाण कुटुंबीयांच्या घरात दरोडेखोरांनी त्यांचे हात-पाय बांधून लूटमार केली होती… या सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. घरातील दागीने व इतर ऐवज लंपास करून पसार झाली होती… याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता… यामध्ये सुमारे 65 हजारहून अधिक मुद्देमाल चोरण्यात आला होता… या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला… पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले…
या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध सूरू केला… अखेर दरोडेखोर खालापूर, पुणे परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली… वेगवेगळी पथके तयार करून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे…