खोपोली शिळफाटा डी.सी.नगरमध्ये जबरी घरफोडी… १८ ते १९ तोळे सोने व चांदी घेऊन चोरट्यांचे पलायन…

0
8

खोपोली शिवसत्ता टाइम्स ( खलील सुर्वे ) :-

सोमवारी रात्रीच्या दरम्यान खोपोली शहरातील शिळफाटा डी.सी. नगर भागात अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची माहिती घेऊन दरवाजाचा लॉक तोडून घरातील तीन कुटुंबांच्या कपाटात असणारे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून, या घटनेत जवळपास १८ ते १९ तोळे सोने व चांदी चोरट्यांनी घेऊन पलायन केले आहे…या घटनेमुळे सर्वत्र परिसरात घबराट पसरली असून, तात्काळ या घटनेची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास जलदगतीने सुरू केला असून, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे…

खोपोली शहरातील शिळफाटा डी.सी.नगर येथे सर्व व्यवसायिक वास्तव्य करीत आहेत… याची जणू काही माहिती घेऊनच अज्ञात चोरट्यांनी या सोसायटीमध्ये मध्यरात्री प्रवेश केला आणि येथील व्दारका अपार्टमेंट ‘बी’ विंगमध्ये पहिला माळा रात्री २.३० च्या दरम्यान जगदीश परमार, अंकित परमार या दोन्ही भावंडांचे बाजूबाजूलाच या ठिकाणी ब्लॉक आहे… घरात कार्यक्रम असल्याने रात्री उशिरा कार्यक्रम संपवून एकाच घरात सर्व मंडळी गाढ झोपी गेली आणि या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रूमचा लॉक तोडून प्रवेश केला आणि घरातील असणाऱ्या कापाटातील सोन्याचे गंथन, हार, झुमके, चैन, आंगठया असे १८ ते १९ तोळे सोने आणि काही चांदीचे दागिने असे एकूण रक्कम १२ लाख ७३ हजार रुपये किंमतीचा माल घेऊन चोरट्यांनी पलायन केले… सदरची घटना सकाळी समजल्यानंतर सर्वांची झोपच उडाली आणि तात्काळ खोपोली पोलिसांना माहिती देताच तात्काळ पोलीस दाखल होऊन पाहणी केली, तर नवीन जबाबदारी स्वीकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल पाटील व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे व सहकारी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेतील चोरटे लवकरात लवकर पकडण्यासाठी सूत्रे हलवीत श्वान पथकाला व फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करून ठस्यांचे नमुने घेतले आहेत…