रायगडात सुधागड भाजपची 2 लक्षची दहीहंडी ठरणार लक्षवेधी… प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून 2 लाख 22 हजार 222 रुपयांची दहीहंडी…

0
7

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

रायगडसह कोकण व महाराष्ट्रात संस्कृती व परंपरेचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे वेध सर्वानाच लागले आहेत…. श्रावणात रक्षाबंधनानंतर येणाऱ्या दहीहंडी उत्सवाकरीता पाली सह रायगड जिल्ह्यात  गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून पुरूषांबरोबर महिलांच्या पथकांनीही जोरदार सरावाला सुरुवात केलीय… यंदा दहीहंडीचा सण १६ ऑगस्ट रोजी असून यंदा पाली सुधागडात दहिहंडीचा आगळा वेगळा व भव्य उत्सव व जल्लोष पहावयास मिळणार आहे…
भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष  पुढाकाराने पालीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….भाजपा पाली सुधागड मध्यवर्ती कार्यालयात आज प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महोत्सव आयोजनपर महत्वपूर्ण बैठक पार पडली… यावेळी  आयोजित दहीहंडी महोत्सवाचे स्वरूप, रूपरेषा व नियोजनाबद्दल उपस्थित नेते मंडळींनी मार्गदर्शन केले… यावेळी भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे म्हणाले की, यंदा आमचे प्रेरणास्थान भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या विशेष पुढाकाराने व प्रमुख नेते मंडळी व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सुधागड तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य दहीहंडी महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे… या महोत्सवास भाजपचे अनेक बडे नेते शुभेच्छा देण्यासाठी पालीत येणार आहेत…या महोत्सवाचे मुख्य आकर्षण व वैशिष्ट्ये म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकास 2 लाख 22 हजार 222 रुपये रोख रक्कमेचे पारितोषिक, आकर्षक चषक व इतर बक्षिसांची खैरात होणार आहे… ही 2 लक्षची दहीहंडी अधिक लक्षवेधी ठरणार आहे… या महोत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी रोख रक्कम 10 हजारांचे पारितोषिक अशी  एक अनोखी पर्वणी लाभणार आहे, असे श्रीकांत  ठोंबरे यांनी सांगितले… तर गोविंदा पथकांना लाखोंची बक्षिसे दिली जाणार असून, या महोत्सवात गोविंदा पथकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी  केल्याने गोविंदा पथकात मोठं आंनददायी वातावरण निर्माण झाले आहे…

हा उपक्रम विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून, या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे… पालीतील दहीहंडी स्पर्धेच्या रोख रक्कमेवर व आकर्षक चषकावर आपले नाव कोरण्याठी  गोविंदा पथकांची मोठी चुरस पहावयास मिळणार आहे… तर गोविंदा पथकांचा हा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातील दहीहंडी प्रेमी, रसिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे… गोविंदा पथकांनी नाव नोंदणी अधिक माहितीसाठी सुशील शिंदे मो.नं. 9209222065, वैभव जोशी  9850607066, शिरीष सकपाळ 9224080359, रोहन दगडे 9028510389, सुजित बारस्कर 94222691848, श्रीकांत ठोंबरे 808743879, अक्षय खोडागळे 7387282114 यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले…