माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील उद्योजक गुलाबराव पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश – रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती.

0
1

माणगाव शिवसत्ता टाईम्स (नरेश पाटील) :- 

सोमवार दि. 20 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांना आज माणगाव तालुक्यातील मोर्बा येथून आणखी एक मजबूत पाठिंबा लाभला आहे. तेथील प्रतिष्ठित उद्योजक गुलाबराव गंगाराम पवार यांनी पक्षात आज जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशासोबतच त्यांना रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली होती. आदरणीय रविंद्र चव्हाण साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष, बापूसाहेब चौधरी, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ज्येष्ठ नागरिक सेल, श्रीहर्ष कांबळे, जिल्हा सचिव, अजहर धनसे, जिल्हा संघटक, संदीप सपकाळ, महाड तालुका अध्यक्ष, राजू रोडेकर, माणगाव तालुका अध्यक्ष, जुल्फीकार टोळ, श्रीवर्धन विधानसभा सरचिटणीस, सदानंद येलवे, जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष, प्राजक्ताताई जाधव, श्रीवर्धन विधानसभा सचिव, अश्विनीताई महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष

या प्रवेशामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलसाठी नवे नेतृत्व उपलब्ध झाले असून, रायगड जिल्ह्यात पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्याची संधी निर्माण झाली आहे.

संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गुलाबराव पवार यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.