रायगडात राजकीय महाभूकंप…महायुतीतच महायुद्ध सुरू… शिंदे गटाचा तटकरे परिवारावर ७० हजार कोटींचा बॉम्बस्फोटक हल्ला…

0
30

रायगड शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

रायगडात सध्या राजकारणाचं रणांगण पेटलं आहे… कोण कोणाचा मित्र, कोण शत्रू – हे समजेनासं झालंय. महायुतीत असलेले शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात अक्षरशः युद्ध छेडलं गेलं आहे. ज्यांनी काल एकत्र खांद्याला खांदा लावून लोकसभेत सुनील तटकरे यांना विजयी केलं, तेच आज त्यांच्या विरोधात स्फोटक आरोप करत आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबावर थेट ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. दळवींचं विधान थेट आणि धारदार तटकरे फॅमिलीने माझा आणि भरत शेठचा घात केला. आम्हाला फसवलं! तटकरे म्हणजे फसवणुकीचं प्रतीक आहेत! एवढ्यावरच नाही, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सुद्धा निशाणा साधत म्हटलं एक बाप मुलासाठी किती खोटं बोलू शकतो, हे महाराष्ट्राने पाहिलं! दळवी यांनी जुने घोटाळे पुन्हा उकरून काढत राष्ट्रवादीवर घणाघात केला… कोलाड नाक्यावरील ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार महाराष्ट्र विसरलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्याची लूट केली आहे!असं ते म्हणाले. दळवींचा दावा, सुनील तटकरे यांनी मला तीन वेळा, भरत गोगावले यांना दोन वेळा फसवलं.याचबरोबर त्यांनी तटकरे कुटुंबावर गंभीर आरोप केला की ते महायुतीत राहूनही महायुतीच्या विरोधातच काम करत आहेत.कर्जतच्या आमदार महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठी तटकरेंनी आघाडीसोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला,असं दळवी सांगतात.या सगळ्या वक्तव्यांमुळे रायगडात राजकीय तापमान चरमसीमेवर पोहोचलं आहे… महायुतीतच दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि संताप दोन्ही आहे. सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप केवळ राजकीय नाहीत, तर वैयक्तिक पातळीवरही प्रहार करणारे आहेत.प्रश्न असा की ही नाराजी अचानक का उफाळून आली? भ्रष्टाचाराचा मुद्दा फक्त बहाणा आहे का, की सत्तेच्या खुर्चीसाठीचं वास्तव युद्ध सुरू झालंय? रायगडचं राजकारण आता भूकंपाच्या तडाख्यात आहे, आणि लोक विचारत आहेत ही लढाई सत्तेसाठी आहे की सत्तेच्या लालसेपोटी?रायगडातलं हे महायुद्ध आता थांबणार नाही, कारण संकेत स्पष्ट आहेत महायुती एकत्र नाही… आतूनच जळते आहे