महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
छत्रपती शिवाजी टेमघर पंचक्रोशी मंडळ टेमघर संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय टेमघर येथे कोकण मराठी साहित्य परिषद महाड शाखेतील कवींचे दर्जेदार कविसंमेलन दिनांक १६/१/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.पल्लवी देशमुख यांनी उपस्थित सर्व कवी/कवयित्री यांचे स्वागत व उत्तम आदरातिथ्य केले. को.म.सा.प.महाड शाखेचे अध्यक्ष श्री गंगाधर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली व शाखेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी जिल्हा समन्वयक श्री अ वि जंगम सर यांच्या मार्गदर्शनाखाली कविसंमेलनाची सुरुवात झाली. या कविसंमेलनात अ वि जंगम,गंगाधर साळवी,उपाध्यक्ष सौ प्रिया शहा,माजी अध्यक्षा सौ स्नेहा गांधी,सदस्या प्रा.स्नेहा काळे,माजी उपाध्यक्ष डॉ शितल मालुसरे,सदस्य सुधीर सकपाळ,सहसचिव चंद्रहास नगरकर,मृणाल महागावकर,युवाशक्ती सदस्या कु.मेघा गोळे या कविनी आपल्या सुंदर आणि दर्जेदार दोन दोन कविता सादर केल्या. उपस्थित काव्यरसिकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेच्या सहा.शिक्षिका सौ वन्हेरे मॅडम आणि विद्यार्थी बालकवी कु.सम्यक सकपाळ यांनी आपल्या अष्टाक्षरी कविता सादर केल्या. या कविसंमेलनाचे उत्तम सूत्रसंचालन सौ स्नेहा गांधी यांनी केले. विद्यालयाने कविसंमेलन आयोजित करून महाड शाखेच्या कवी/कवयित्री यांना निमंत्रित केले याबद्दल संस्था व विद्यालय यांचे प्रास्ताविकात अध्यक्ष गंगाधर साळवी आभार मानले. को.म.सा.प.माजी जिल्हाध्यक्ष आणि महाडचे मार्गदर्शक श्री.सुधीर शेठ व युवाशक्ती प्रमुख योगेश देवघरकर यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून देखील साहित्याच्या प्रेमापोटी संमेलनास उपस्थिती लावली. रुचकर भोजनानंतर संमेलन सांगता झाली.

