किल्ले रायगडावर विधीवत पूजा; शिवसेना शिंदे गटाचा प्रचाराचा शुभारंभ… रायगड किल्ल्यावर शिवसेना शिंदे गटाचा प्रचार शुभारंभ…

0
1

रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी रायगडमध्ये सुरु झाली असून शिवसेनेच्या शिंदे गटाने किल्ले रायगडावर विधीवत पुजा करून प्रचाराचा नारळ फोडला. मंत्री भरत गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले यांच्या सह रायगडचे उमेदवार मंदा आवकिरकर, दासगाव खाडी पट्टयाच्या उमेदवार प्रेरणा सावंत, खरवलीच्या उमेदवार मनाली काळीजकर, वरंधच्या उमेदवार नुतन मोरे आदी उपस्थित होते.  उमेदवर, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी किल्ले रायगडावर जाऊन जगदीश्वर मंदिरात विधीवत पुजा केली.  शिवसमाधी आणि राजसदरे समोर नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला.