पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाराष्ट्र पुन्हा प्रगतशील,वैभवशाली बनविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षातील महिला आघाडी,युवासेना आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पुनर्बांधणी करण्यासाठी भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे… या माध्यमातून अधिकाधिक शिवसैनिक जोडण्याचे काम करण्यात येत आहे…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी शिवसेना रायगड जिल्हापमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताहाच्या माध्यमातून पनवेल ग्रामीण येथील अनवी फार्म मालडुंगे येथे वृक्षारोपन व शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रयत्नातून मालडुंगे येथील युवकांचा शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी मशाल हे चिन्ह घरोघरी पोचवण्याचा प्रचार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, संदीप तांडेल, युवासेना सहसचिव अवचित राऊत, जिल्हाधिकारी पराग मोहिते, महेश भिसे, अँड.प्रशांत अनगुडे, नागेंद्र सिंह, ग्रामीण विभाग प्रमुख दत्ता फडके, शशिकांत भगत, धनंजय पाटील, अजय पाटील, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक आदी पदाधिकारी उपस्थित होते…