चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
खालापूर तालुका आदिवासी समाजाच्यावतीने ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला…खालापूर येथे आदिवासी भवनात अध्यक्ष विष्णु खैर व दिलिप डाके यांनी क्रांतिकारी आदिवासी नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चौक येथून आदिवासी रॅलीला सुरुवात करण्यात आली.यावेळी शेकडो आदिवासी महिला पुरुष, मुले सामील झाले होते…आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जगभरातील स्थानिक लोकसंख्येच्या हक्कांचे जागृती आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो…हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षणा सारख्या जागतिक समस्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील समजला जातो.स्थानिक लोक करत असलेल्या कामगिरी आणि योगदानांना देखील ओळख मिळत असते. जागतीक आदिवासी दिवस समृद्ध संस्कृती,वारसा,परंपरा, भाषा यांचे जतन करण्यासाठी ओळख दिवस म्हणूनही जगासमोर आणण्यासाठी साजरा केला जातो.चौक येथे सरपंच रितू ठोंबरे, सुधीर ठोंबरे, प्रफुल्ल विचारे,मोतीराम ठोंबरे, राजु मोरे, कमल भस्मा, सौ.राणे, माजी समाज कल्याण सभापती दामू खैर,अंकुश वाघ यांनी आदिवासी क्रांती नेते यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केल्यावर रॅलीला झेंडा दाखविला.ही रॅली चौक गावातून खोपोली येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात येऊन आदिवासी महीला व पुरुषांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले.समाजातील कर्तृत्वान मुलांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्ष विष्णु खैर,उपाध्यक्ष दिलीप डाके, सचिव अनंता वाघमारे,खजिनदार संजय वाघमारे, सहखजिनदार राम शिंगवा, संदीप भस्मा, महादेव पिरकट,रवि बांगरे,नारायण निरगुडे,हिराबाई पवार, मनीषा पवार,सीमा मेंगाल,संतोष मेंगाल, शंकर होला यांच्यासह आदिवासी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते… यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला…जणूकाही उत्सव साजरा होत असल्याचे दिसून आले…