बीएमटीसी कामगारांचे लाक्षणिक उपोषण… सिडको कार्यालयासमोर श्रुती म्हात्रे आक्रमक…

0
101

पनवेल शिवसत्ता टाइम्स दत्ता (मोकल पनवेल) 

दिवंगत कामगार आणि काँग्रेस नेते स्वर्गीय श्याम म्हात्रे यांच्या कन्या श्रुती म्हात्रे यांचा परिसरात महिला कामगार नेत्या म्हणून दबदबा आहे… त्याची झलक बीएमटीसी कामगार लाक्षणिक उपोषणावेळी सिडको सीबीडीमध्ये दिसून आली…  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना, बीएमटीसी कामगारांना ,मिठागर कामगारांना,भूमी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या  सिडकोला त्यांनी  धडा शिकवला… 9 ऑगस्ट रोजी  एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सिडको कार्यालयासमोर करण्यात आले…  यावेळी  सिडकोच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन 13 ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले…  त्यानंतर डॉक्टर श्रुती म्हात्रे  यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली… यावेळी त्यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलशी बोलताना जर मंत्रालयातील बैठकीत न्याय मिळाला नाही तर 15 ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन  उभारण्याचा इशारा दिला…