खोपोली नगर शहरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविणार! नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज पाटील यांची प्रतिक्रिया…

0
98

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे)

खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हर घर झेंडा अभियान १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत खोपोली शहरात विविध उपक्रमांनी साजरे केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी दिली…दि.९ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापने, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणार आहोत…घरोघरी तिरंगा अभियानाचे बॅनर लावून हातात तिरंगा झेंडा घेऊन नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली…केंद्र शासनाने 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियान सुरु केले…यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे…यावर्षीही शहरातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे…या अभियानाचा शहरात शुभारंभ 9 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा रॅली, देशभक्ती सांस्कृतिक कार्यक्रम तसेच तिरंगा सन्मान दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी प्रत्येकाने आपल्याकडे असलेल्या तिरंगा ध्वजाची देखभाल, दुरुस्ती करून 13 ऑगस्ट रोजी घरावर लावण्यास सज्ज करून ठेवायचा आहे. दि.13 ते दि.15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे…
प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा ध्वज दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट या कालावधीत फडकवावा, यासाठी त्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. राज्यभरात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे…गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तसेच राज्यस्तरावरही यानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी,प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत…नागरिकांच्या अधिकाधिक सहभागाने हे अभियान खोपोली नगर परिषद हद्दीत यशस्वी करावयाचे आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉं. पंकज पाटील यांनी केले आहे…