Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडपोलीस,तहसीलदार साहेब नव्हेत  तर लोकसेवक... उरणमधील शिवसेनेच्या जनमोर्चाने दाखविली ओळख...  

पोलीस,तहसीलदार साहेब नव्हेत  तर लोकसेवक… उरणमधील शिवसेनेच्या जनमोर्चाने दाखविली ओळख…  

 उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी उरणमध्ये तहसील कार्यालयावर काढलेला मोर्चा सर्वार्थाने वेगळा ठरला… या मोर्चाने सरकारी अधिकारी,कर्मचारी यांची खरी ओळख दाखवून दिली… लोकशाहीमध्ये लोक म्हणजेच जनता ही राजा असते… लोकप्रतिनिधी हे त्या राज्याचे विश्वस्त असतात… तर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे त्या राज्यातील जनतेचे नोकर असतात…कोणताही बडा अधिकारी साहेब नसतो… तर लोकसेवक असतो… पोलीस महासंचालक,महानिरीक्षक,आयुक्त,अधीक्षक,निरीक्षक ते पोलीस कर्मचारी आणि महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी,तहसीलदार ते शेवटचा घटक हे सर्व साहेब नव्हेत  तर लोकसेवक आहेत… मात्र मिळालेल्या काही अधिकारांमुळे हे अधिकारी स्वतःला साहेब समजू लागतात…त्या तोऱ्यात  वागतात… जनतेला नोकर समजतात…मग त्यांचा तोरा उतरविण्यासाठी जनतेला मोर्चा काढावा लागतो.. या मोर्चाद्वारे बड्या अधिकाऱ्यांना त्यांची लोकसेवक ही ओळख दाखवून द्यावी लागते…उरणमधील शिवसेनेच्या जनमोर्चाने हेच दाखवून दिले…माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर हे अत्यंत शांत,प्रशासनाला समजून घेणारे संयमी नेते म्हणून ओळखले जातात… मात्र उरण तालुक्यात प्रशासकीय सेवा पूर्णपणे डळमळीत झाल्याने मोर्चानंतर त्यांचा आक्रमकपणा उरणकरांना पुन्हा एकदा पाहता आला…तुम्हाला ही खुर्ची जनतेने दिली आहे…संतापलेली जनता या खुर्चीवर लाथही मारेल…असे ते म्हणाले… म्हणजे जनता ही सर्वश्रेष्ठ आहे… त्यांचा हा इशारा प्रशासनाला हादरवणारा ठरला…त्यामुळेच मोर्च्यानंतर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या शिष्ठमंडळाला उत्तरे देताना तहसीलदारांसह अधिकाऱ्यांची तत्-पप होत होती…शिवसेनेच्या मोर्चात अपंग आणि मुस्लिम महिलाही सहभागी झाल्या होत्या… एकंदर उरणमध्ये प्रशासनाविरोधात मोठी चीड या मोर्चाद्वारे व्यक्त झाली… उरणच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान आमदार आणि तहसीलदार यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली… सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना सरकारतर्फे भरमसाठ पगार,एसी केबीन,राहायला घर ,फिरायला वाहन,सेवेला नोकर,शनिवार-रविवार भरपगारी सुट्टी म्हणजे आठवड्याला पाच दिवसच काम,याशिवाय अन्य शासकीय सुट्ट्या,जीविताची हमी,मेडिक्लेम,आजारी सुट्ट्या,विविध भत्ते,प्रॉव्हिडंट फंड,८ तास ड्युटी, सेवा निवृत्तीनंतर ग्रॅजुटी,पूर्ण पीएफ,मृत्यूपर्यंत पेन्शन… नंतर तीच पेन्शन पत्नीला … तिच्या मृत्यूपर्यंत … अशा सोयी,सुविधा आणि सवलती दिल्या जातात…या बदल्यात या सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या ८ तासाच्या ड्युटीत जनतेला चांगली सेवा द्यावी… ती ही स्वतःला लोकसेवक समजून… साहेब समजून नव्हे…अशी सरकरची अपेक्षा असते..या अपेक्षेला तडे गेल्यास लोकांचा राग मोर्चाद्वारे बाहेर पडतो… यालाच पब्लिक आऊट क्राय म्हणतात…उरणमध्ये सध्या प्रशासनाविरोधात पब्लिक आऊट क्राय आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments