उरण ते बेलापूर / नेरुळ रेल्वे लोकल फेऱ्यात १५ डिसेंबरपासून वाढ…

0
74

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-

उरण ते बेलापूर / नेरुळ रेल्वे लोकल फेऱ्यात १५ डिसेंबरपासून वाढ करण्यात आली असून उरण मधुन  पहिली  फेरी बेलापूर ची  पहाटे ५.३० आहे तर रात्री १०.३० बेलापूरमधून उरणसाठी आहे.उलवा ते उरणकरांसाठी रेल्वेने वाढीव लोकल फेऱ्या सुरु केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे कौतुक…

ही सेवा थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुरु करून दि.बा.पाटील अंतराराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवली जावी, नेहरू बंदराकडे ये जा करणारे कामगार,मुंबईत खरेदीसाठी जाणारे व्यापारी, एपीएमसीत किरकोळ आणि घाऊक खरेदी करणारे, करंजा डॉकमध्ये किरकोळ आणि घाऊक मासे खरेदी करणारे,नौदल शास्त्रागाराकडे ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना रेल्वेने दिलासा द्यावा,अशी इथल्या प्रवाशांची मागणी आहे.