महावितरण पेण मंडळाचा ‘मनोरंजन 2025’ सोहळा रोह्यात उत्साहात संपन्न…

0
2

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पेण मंडळाचा ‘मनोरंजन 2025’ हा वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महावितरण भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता माननीय श्री. संजय शंकर पाटील हे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यप्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. श्री. दत्ता कोहीनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मनाची अमर्याद शक्ती आणि तणावमुक्ती या विषयावर विशेष संबोधन केले. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना मानसिक तणाव कसा कमी करता येईल याची माहिती दिली. या प्रात्यक्षिकात रोह्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र जाधव यांच्यासह काही उपस्थितांवर प्रयोग करून दाखवण्यात आला.

या कार्यक्रमाला पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. धनंजय बिक्कड, रोहा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप डाळू, गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रामकृष्ण पाटील, अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शैलेश कुमार, पेण मंडळ प्रशासनाचे कार्यकारी अभियंता श्री. उमेश चव्हाण, रोहा विद्युत वितरणचे अधिकारी श्री. जतीन पाटील तसेच रोहा ग्रामीण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. संजय शंकर पाटील यांनी स्पष्ट केले की, प्रिपेड मीटरची कोणतीही बदली करण्यात येत नाही. मात्र पोस्टपेड मीटर बदलले जात असून, याचा नागरिकांना विशेष फायदा होणार आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ऑनलाईन तक्रार प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.