माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून, मातोश्री स्वर्गीय श्रीमती बारकी बापू शिंदे यांचे रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी 06:00 वाजता वयाच्या ९२ व्या वर्षी शांतपणे राहत्या घरी वृद्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने कुटुंबाने एक मायेचा आधार गमावला असून त्यांनी जपलेला प्रेम, संस्कार व माणुसकीचा वारसा मागे राहिला आहे.
स्वर्गीय श्रीमती बारकी बापू शिंदे यांच्या पश्चात चार कन्या व दोन पुत्र, सहा नातवंडे (नात्या), सहा नातवंडे (नातू), तीन जावई व त्यांची मुले असा मोठा परिवार आहे. त्या माणगाव येथील सुप्रसिद्ध नागरिक विठ्ठल बापू शिंदे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरांतील नागरिक, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या व श्रद्धांजली अर्पण केली. त्याच दिवशी दुपारी कुटुंबीय, आप्तस्वकीय व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतिम विधी विठ्ठल शिंदे व शंकर शिंदे यांनी पार पाडले.
अंत्यसंस्कारापूर्वी स्वर्गीय बारकी शिंदे यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा जवळचे नातेवाईक सदानंद तुकाराम तेटगुरे उर्फ सदां भावू यांनी दिला. त्यानंतर त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. त्यांचा बारावा विधी बुधवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी होणार असल्याची घोषणा अंत्यसंस्कारावेळी करण्यात आली.
या अंत्यविधीस माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाष भोणकर, नगरसेवक तार्लेकर यांचे प्रतिनिधी बंधू अनिया तार्लेकर, साळवा ग्रामपंचायतचे उपसरपंच भागोजी तेटगुरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश तेटगुरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून, मातोश्री स्वर्गीय बारकी बापू शिंदे यांच्या साधेपणा, माणुसकी व कुटुंबावर रुजवलेल्या संस्कारांमुळे त्या कायम स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दांत अनेकांनी विठ्ठल व शंकर शिंदे यांचे सांत्वन केले.

