Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडकोयना प्रकल्पग्रस्त नेते कै.कृष्णा मुसळे यांचा स्मृतिदिन... स्मृती दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन...

कोयना प्रकल्पग्रस्त नेते कै.कृष्णा मुसळे यांचा स्मृतिदिन… स्मृती दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन…

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे नेते कै.कोयनारत्न कृष्णा मुसळे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ,रायगड,ठाणे व पालघर यांच्यावतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…यावेळी १००० पेक्षा रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले…कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ हा रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात सक्रिय कार्यरत आहे.समाजाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केले जाते. अध्यक्ष तुळशीराम सावंत आणि उपक्रम प्रमुख  महेंद्र सावंत व त्यांची कार्यकारिणीने यांनी टाटा हॉस्पिटल खारघर,एम.जि.एम.हॉस्पिटल कळंबोली(पनवेल),मातोश्री लॅब कर्जत,शारदा लॅब पेण, स्मरण हॉस्पिटल घाटकोपर(मुंबई ) यांच्या सहकार्याने तीन जिल्ह्यातील १० विभागात एकाचवेळी हे महाशिबिर आयोजित करून १००० पेक्षा जास्त रक्त बाटल्यांचे संकलन केले आहे.कारगाव विभाग, देऊर विभाग,वडवळ विभाग,मालदेव विभाग,आराव विभाग,आडोशी चौक, आकल्पे पिपंरी विभाग,ठाणे जिल्हा मोरनी विभागातील कोयना प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.अध्यक्ष तुळशीराम सावंत,कार्याध्यक्ष श्रीरंग सोनु भातोसे,उपाध्यक्ष किसन मरागजे,विठ्ठल मारूती कदम, विजय शिंदे,चिटणीस दत्ता सकपाळ,सह चिटणीस सचिन जाधव,किसन सकपाळ,खजिनदार धनाजी सकपाळ, माजी अध्यक्ष पांडुरंग साळुंखे, बळीराम शिंदे, जगदीश मरागजे,जितू सकपाळ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments