अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
भारताचे मूलनिवासी म्हणून आदिवासी बांधवांना ओळखले जाते… जगभरात आदिवासींसाठी विशेष कायदे आहेत… तसेच विशेष कायदे भारतात आहेत… घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ व्या व ६ व्या अनुसूचीनुसार भारतात आदिवासींना विशेष अधिकार दिले आहेत… अमेरिकेतही आदिवासींना विशेष अधिकार आहेत… तेथील आदिवासींना रेड इंडियनस म्हणून ओळखले जाते…तर अशा या आदिवासी बांधवांचा ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे…हा आदिवासी दिन अलिबागेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…यावेळी शेकडो आदिवासी महिला पुरुष, मुले सामील झाले होते… आदिवासी बांधवांच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते दिलीप भोईर उर्फ ( छोटमशेठ भोईर ) उपस्थित होते…आदिवासी बांधवांना छोटमशेठ यांनी मार्गदर्शन केले…यावेळी त्यांनी त्यांच्यावर शिंदे गट जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी पेण येथे केलेल्या टिकेचा जोरदार समाचार घेतला… छोटमशेठ कमालीचे आक्रमक होऊन राजा केणींच्या विरोधात बोलत होते… त्यामुळे छोटमशेठ समर्थकांनी पत्रकरांशी हितगुज साधताना… आमच्या शेठने… राजाचा वाजवला बाजा… अशी प्रतिक्रिया दिली…