पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
एखाद्याच्या कर्माचे घडे भरले की… त्याने आयुष्यात केलेल्या माजोरीगिरीचे धडे त्याला पुढे मिळत जातात… पनवेल विधानसभा मतदारसंघात असे दिवस निष्क्रिय आमदार प्रशांत ठाकूर व भाजपाच्या वाट्याला येणार आहेत… कारण या लोकांनी अजूनपर्यंत उत्तर भारतीय बांधवांचा फक्त मतांसाठी वापर केला… या बांधवांच्या विकासासाठी काही केले नाही… त्यांना गावी जाण्यासाठी रेल्वेची कोणतीही व्यवस्था केली नाही… त्यामुळे या लोकांना अजूनही गावी जाताना रेल्वेतून भेड-बकरीयांसारखा प्रवेश करावा लागत आहे… भाजपच्या आमदार-खासदारांनी एव्हढया वर्षात या लोकांच्या जीवावर निवडून येऊन सुद्धा उत्तर भारतीयांचे क्षुल्लक क्षुल्लक प्रश्न सोडविले नाहीत… आता आता उत्तर भारतीय लोकांच्या ध्यानात हे येऊ लागल्याने उत्तर भारतीय बांधव निष्क्रिय आमदार प्रशांत ठाकूर व भाजपची साथ सोडत आहेत… उत्तर भारतीय मतदार भाजपचा श्वास आहे… हा श्वासच जात असल्याने… भाजप मरणासन्न अवस्थेत आला आहे… एकीकडे ही स्थिती आहे… तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत उत्तर भारतीय बांधवांचा शिवसेनेत प्रवेशावर प्रवेश घडवत आहेत… शिरीषदादांची पक्षप्रवेशांद्वारे भविष्यातील पनवेल विधानसभा आमदारकीकडे वाटचाल सुरु असल्याचा दावा शिवसैनिक करीत आहेत… आज रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी कामोठे, नवीन पनवेल परिसरातील उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपला नेता मानून जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला… यावेळी शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर संघटक डी.एन. मिश्रा, कामोठे शहर संघटक संतोष गोळे, उपशहर प्रमुख गणेश खांडगे, विभाग प्रमुख बबन गोगावले, एकनाथ गोवारी, युवासेना महानगर अधिकारी महेश भिसे, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, अॅड प्रशांत अनगुडे, नेताजी नागेंद्र सिंह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उत्तर भारतीय बांधवांनी भाजपवर जोरदार टीका करून जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांना आमदार करण्याचा निर्धार जाहीर केला… कामोठे, नवीन पनवेल, उलवे आणि पनवेल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या उत्तर भारतीयांची नावे येणेप्रमाणे – सर्वण सिंह, राकेश सिंह, विनय दुबे, योगेश सिंह, आरके ठाकुर, जयनेश्वर शहा, गौतम शिंघ, संजय सिंह, जितेंद्र सिंह, धर्मेद्र सिंह, संकेत, विजय, सुमित सिंह, विपुल सिंह, पवन कुमार सिंह…