मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):
मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांची काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली… विधानसभा निवडणुकीतही महाभ्रष्ट महायुती सरकारला मुंबईकर घरचा रस्ता दाखवतील असे ते म्हणाले… काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला…
शनिवार दि. १७ ऑगस्ट 2024 रोजी मुंबई काँग्रेस भवनात सदर पत्रकार परिषद झाली…
मुंबई न्याय यात्रेबद्दल पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी आतापर्यंत झालेल्या यात्रेबद्दल थोडक्यात माहिती दिली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, शकील चौधरी उपस्थित होते…