Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजबदलापूर पाठोपाठ नवी मुंबईत अल्पवयीन मुलींवर विनयभंग... दिघा येथे रात्री भररस्त्यात दोन...

बदलापूर पाठोपाठ नवी मुंबईत अल्पवयीन मुलींवर विनयभंग… दिघा येथे रात्री भररस्त्यात दोन मुलींवर विनयभंग…  

बदलापूर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

बदलापूर येथील 4 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे  प्रकरण ताजे  असतानाच नवी मुंबईतील दिघा परिसरातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. दिघा परिसरातील दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8वाजण्याच्या सुमारास घडली आहे… 10 आणि 11 वर्षांच्या मुली दिघा परिसरातील स्टेशनरी दुकानात प्रोजेक्ट बनवण्यासाठी कार्डबोर्ड पेपर खरेदी करण्यासाठी जात होत्या. यावेळी आरोपी संजय गायकवाड (वय 48 वर्ष) याने रात्री 8 वाजता दोन्ही मुलींना थांबवून अश्लीलरीत्या स्पर्श करून त्यांना लाजवेल, असे वर्तन केले. आरोपी संजय गायकवाडच्या वर्तनामुळे दोन्ही मुली घाबरल्या. त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला…  त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले…दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी संजय गायकवाड याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे  लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉस्को) कायद्याच्या कलम 74 नुसार आणि कलम 8 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दिघा येथून आरोपी संजय गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments