रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक रणधुमाळीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटाने बाजी मारली असून दणदणीत विजयी प्राप्त केला आहे जिल्हा परिषदेचे एकूण 2 पैकी 2 विजयी तर पंचायत समितीचे एकूण 6 पैकी 6 उमेदवार विजयी झाल्याने विरोधकांना भुईसपाट केला असल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला…
त्यामुळे श्रीवर्धन विधान सभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे… लोकसभा आणि विधान सभा निवडणुकांमध्ये स्व.अंतुले यांच्या निवास स्थानी घेतलेली अखेरची सभा ही आशीर्वादाची सभा म्हणून आता घोषित करण्यात हरकत नाही पुन्हा एकदा या निवडणुकीची अखेरची सभा अंतुले यांच्या निवास स्थानी पार पडली आणि विजयाची साक्ष ठरली त्यामुळे मुश्ताकजी अंतुले यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या अखेरच्या सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी सभा ठरल्या आहेत… हा विजयी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा आहे असा उल्लेख यावेळी मुश्ताकजी अंतुले यांनी केला आहे … या विजयाचे शिल्पकार खासदार तटकरे मंत्री आदिती ताई व आमदार अनिकेत भाई असल्याचे देखील त्यांनी भावना व्यक्त केल्या…

