महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
देशात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा होत असताना महाडमध्ये महाड प्रेस असोसिएशनच्यावतीने दहीहंडी फोडून पत्रकारांनी जल्लोष केला…गेली सहा वर्ष महाड प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून हा दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे.दैनिक सागर कार्यालयाच्या चौकामध्ये हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.महाड प्रेस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सकाळी दैनिक सागर कार्यालयात जमून दहीहंडी तीन थरावर बांधून त्यानंतर खालुबाजाच्या तालावर लेझीम नाचून आणि गोविंदा आला रे आला अशा पारंपारिक गाण्यांवर नाचून आपला आनंद व्यक्त केला.त्यानंतर पत्रकार रोहन शिंदे यांच्या लहानग्या अर्जुनने तिसऱ्या थरावर जाऊन ही हंडी फोडली आणि उपस्थित पत्रकारांनी जल्लोष करून नाचून आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी महाड प्रेस असोसिएशनचे रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे,महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी,कार्याध्यक्ष प्रसाद पाटील,सचिव श्रीकांत पार्टे,ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नगराध्यक्ष संदीप जाधव,ज्येष्ठ पत्रकार रवी शिंदे,ज्येष्ठ पत्रकार संजय भुवड,उत्तम तांबडे,राजेश भुवड,रोहन शिंदे,चंद्रहास नगरकर,मयुरी खोपकर,समीर बुटाला यांच्यासह निलेश अडखळे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते…