शिवरायांचा पुतळा कोसळला म्हणून आत्मक्लेश आंदोलन… महाराज आम्हाला माफ करा…लोळत रस्त्यावर घातले लोटांगण….  विष्णूभाईंच्या मार्गदर्शनाखाली रवींद्रनाथ पाटील यांचे आंदोलन

0
84

पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल):  

केंद्रातील आणि राज्यातील नालायक भाजप-तिघाडी सरकारमुळे मालवण येथील शिवरायांचा पुतळा कोसळला… दोषी भाजपवाले असताना याचे प्रायश्चित्त पेण विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने घेतले… शिवसेनेचे माजी रायगड जिल्हाप्रमुख, विद्यमान  जिल्हा संपर्कप्रमुख आणि आंदोलन सम्राट विष्णूभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले… रवींद्रनाथ उर्फ बाळू पाटील यांनी हे अनोखे आत्मक्लेश आंदोलन केले… महाराज आम्हाला माफ करा असे म्हणत लोटांगण घालत शासनाचा निषेध केला…
एचडीएफसी बँकेसमोरून  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोळत जाऊन बाळू पाटील यांनी हे आंदोलन केले… स्वतःचे कान धरुन त्यांनी २१ उठा-बशा काढल्या… त्यानंतर ते महाराजांच्या पुतळ्यासमोर अर्धा तास ध्यानस्थ बसले… महाराजांबाबत आदर व्यक्त करुन माफी मागितली…
या अनोख्या आंदोलनात  जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील, नरेश गावंड, रविंद्र  उर्फ बाळू )पाटील, जीवन पाटील, प्रवीण पाटील, योगेश पाटील, तुकाराम म्हात्रे, भगवान पाटील, सुहास पाटील, वैशाली समेळ, नरेश सोनावणे, असादअली आखवारे आदींसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश होता…