Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगड२१ दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकान... रायगड जिल्हा परिषदेची दुकान योजना... 

२१ दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकान… रायगड जिल्हा परिषदेची दुकान योजना… 

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगार प्राप्त होऊन ते स्वावलंबी व्हावेत, या उद्देशाने त्यांना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (ई-टेम्पो, मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, १६० दिव्यांग बांधवांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले होते. यापैकी २१ दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळणार असून, गुरुवारी (दि.२९) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. शासकीय मूकबधिर विद्यालयातील इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी आदर्श बुधे या मुलाच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.

ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या २०२४/२५ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments