उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघर येथील वाढवण बंदराचे लोकार्पण शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी होणार आहे…दुपारी एक वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे…सदर बंदर 76 हजार 200 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आले आहे…उदघाटनच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी होण्यासाठी उरण तालुक्यातील झोपडपट्टी,जेनपीए प्रकल्पग्रस्त गावे व शाळांमधील मुलांना वेठीस धरण्यात आले आहे… खाऊ व पैशाचे आमिष दाखवून पहाटेच एसटीतून नेण्यात आले…पहाटे उरण बस आगारातून जवजवळ ५० ते ६० एसटी बसेस सोडण्यात आल्या…एरव्ही बस आगारमध्ये पहाटे ५ वाजता साधा विजेचा दिवा न पेटविणारे, नियंत्रण कक्षात उपस्थित न राहता डेपोच्या आतून बसचे नियंत्रण करणारे,एकही बस लोकांसाठी वेळेवर न सोडणारे एसटीचे अधिकारी, नियंत्रक, आगार व्यवस्थापक जातीने हजर होते…शिवाय चालक वाहकही उपस्थित होते…प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढवण कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी दिसण्यासाठी उरण आगारातुन मोठ्या प्रमाणात एसटीच्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत…