रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
केंद्रातील आणि राज्यातील भाजपा-तिघाडी सरकारमुळे मालवण येथील शिवरायांचा पुतळा कोसळला…
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे अत्यंत दुर्दैवी व मनाला संताप आणणारी घटना आहे. पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे… म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला…तसेच तहसीलदार किशोर देशमुख यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले..या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली…यावेळी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…