Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमुंबई–गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम...ठेकेदार व कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...

मुंबई–गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम…ठेकेदार व कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.महामार्गाचे निकृष्ठ काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, अवधेशकुमार सिंह, अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी  तक्रारी केली होती. त्यानुसार  माणगाव पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला…कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकी करणाचे काम सुरु केले. परंतु त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहीन काम केले… दर्जाहीन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले.  काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हे काम केले नाही.  त्यामुळे या महामार्गावर  अपघात होऊन होऊ लागले. २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले.  त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले.  त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक  सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार  करीत आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments