Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रशिवपुतळा कोसळणे आणि  सावरकर विषय वेगळे ? विषयांतर करण्यात...

शिवपुतळा कोसळणे आणि  सावरकर विषय वेगळे ? विषयांतर करण्यात नरेंद्र मोदी आणि भाजपा एक्स्पर्ट…माफी मागितली म्हणजे विषय संपला असे होत नाही

 मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले… यावेळी त्यांच्या सभेला गर्दी दिसावी म्हणून राज्य सरकारच्यावतीने लोकांना जबरदस्तीने धरून,आमिषे दाखवून ,एसटीच्या गाड्या बूक करून ,लोकांना फुकट नास्ता व जेवण देऊन आणण्यात आले… वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. या बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी माफी मागितली…. त्यांच्या मते माफी मागितली म्हणजे विषय संपला… मात्र याकामी झालेल्या भ्रष्ट्राचाराचे,दोषी लोकांचे काय… ?असा जनतेचा सवाल आहे…       नरेंद्र मोदींनी यावेळी सावरकरांचा विषय काढला… शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी सावरकरांचा संबंध काय ?असा लोकांचा सवाल आहे…विषय डायव्हर्ट करण्यात नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपा परिवार एक्स्पर्ट आहे… सावरकरांचा विषय जुना आहे… सध्या विषय शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा आहे…यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग आहे… त्यांच्याच उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण झाले… सावरकरांवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली होती… ती टीका सावरकरांनी इंग्रंजांकडे सादर केलेल्या माफीनाम्याबाबत होती… सावरकरांचा माफीनामा हा विषय वस्तुस्थिती  दर्शविणारा आहे…भारत सरकारकडे हे माफीनामे उपलब्ध आहेत… सावरकरांचा माफीनामा… हा विषय त्यांच्या अपमानाचा नाही…इंग्रजांकडे दयेचा अर्ज सावरकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात केला…हा इतिहास आहे… राहुल गांधी जे काही बोलले… त्यांनी जी टीका केली… ती चुकीची असेल तर त्यांना कायद्याने शिक्षा होईल… शिवाजी महाराज आणि सावरकर हा विषय पूर्णपणे वेगळा आहे… शिवरायांचा पुतळा कोसळण्याला पूर्णपणे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे… याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे…त्यामुळे नरेंद्र मोदींनी माफी मागितली म्हणजे विषय संपला असे होत नाही…मोदींनी सावरकरांचा विषय काढून विषयांतर करू नये… असे देशभरातील शिवप्रेमी बोलत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments