Saturday, November 23, 2024
Homeअपघातउरण हीट अँड रन प्रकरण आता सोशल मीडियावर... गाडीतील तरुण-तरुणीचे पोलिसांनी मेडिकल...

उरण हीट अँड रन प्रकरण आता सोशल मीडियावर… गाडीतील तरुण-तरुणीचे पोलिसांनी मेडिकल केले का…?

उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-   

उरण हीट अँड रन प्रकरण आता सोशल मीडियावर अवतरले असून या प्रकरणाची  गोलमाल है भाई गोलमाल है अशी चर्चा आहे… हे प्रकरण उरण पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे… अपघाताची घटना घडल्यानंतर पत्रकारांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही… अद्यापावेतो पोलिसांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतल्याचे ऐकिवात नाही… तरी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे… कारण काही सामाजिक कार्यकर्ते न्यायालयात जाणार आहेत अशी उरणमध्ये चर्चा आहे… उरण हीट अँड रन प्रकरणी गोलमाल है भाई गोलमाल है अशी चर्चा आहे… कारण नंबर एक… अपघातानंतर त्या मार्गावरील सिसिटीव्ही फुटेज पावसाचे कारण देत स्पष्ट चित्र दाखवत नसल्याचे पोलिसांकडून  सांगण्यात येत आहे… कारण नंबर दोन… गाडी कोण चालवत होता… होती…? हे स्पष्ट करणारा पुरावा अद्याप समोर आल्याचे दिसत नाही… कारण नंबर तीन अपघातानंतर जखमीला हॉस्पिटलला नेण्याऐवजी आरोपी पळून गेले. त्याच्या मैत्रिणीनेही त्याला याबाबत सांगितले नाही… नंबर चार पोलिसांना याविषयी अंधारात का ठेवले…? त्यामुळे तरुणासोबत त्या तरुणीला  सहआरोपी का केले गेले नाही…? नंबर पाच पुरावा नष्ट करण्यासाठी ते पळून गेल्याचा लोकांचा आरोप आहे… कारण नंबर सहा गाडीतील दोघांचीही मागील सहा महिन्यांची मेडिकल हिस्ट्री पोलिसांनी का मागविली नाही…? नंबर सात त्या दोघांनी काही नशा केली होती का…? त्यांचे मेडिकल करण्यात आले का…? असे लोकांचे सवाल आहेत… आणि कारण नंबर आठ आरोपीला म्हणजेच तिच्या बॉयफ्रेंडला अटक न करता उरण पोलीस ४१ ची नोटीस का बजावणार आहेत…?         दरम्यान कलम ४१ च्या उप-कलम (१) च्या तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीला अटक करणे आवश्यक नसलेल्या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी, ज्या व्यक्तीविरुद्ध वाजवी तक्रार करण्यात आली आहे, किंवा विश्वसनीय माहिती आहे अशा व्यक्तीला निर्देश देणारी नोटीस जारी करू शकतात… हिट अँड रन प्रकरण या कक्षेत येते का…? उरण पोलिसांना याची उत्तरे द्यावी लागणार आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments