शिरीषदादा पनवेलचे आमदार व्हावेत… बिग बॉस फेम दादूसने घातले खंडेरायाला साकडे…  

0
130

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

सोमवती अमावस्येनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांनी बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ सगळ्यांचा लाडका दादूस यांच्यासोबत रविवार दि. २ सप्टेंबर रोजी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले…तसेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळावा असे साकडे खंडेरायाचरणी घालण्यात आले…शिरीषदादा देखील खंडोबाच्या जेजुरीत भंडाऱ्याने न्हाऊन गेले होते…यावेळी ‘बिग बॉस फेम दादूस यांनी देखील शिरीषदादांच्या आमदारकीसाठी खंडेरायाचरणी साकडे घातले…व आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या…यळकोट यळकोट जय मल्हार…सदानंदाचा यळकोट असा नाद जेजुरीत घुमला…यावेळी त्यांच्यासोबत पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल उपस्थित होते…