Wednesday, September 18, 2024
Homeक्राईम न्यूजकत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ५ जनावरांना मिळाले जीवदान... आरोपींविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा...

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ५ जनावरांना मिळाले जीवदान… आरोपींविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

 नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

कर्जत तालुक्यातील कळंब गावच्या हद्दीत बोरगाव ते चिकनपाडासाळोख येथे जाणाऱ्या रस्त्यावरून गोवंशीय जनावरांना कोणत्याही वाहनाने न नेता पायी कत्तलीसाठी नेत असल्याचे बोरगाव कळंब येथील स्वयंसेवकाच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नेरळ पोलीस चौकीचे  पोलीस उपनिरीक्षक वसावे यांना ही बाब सांगितली…नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसावे व पोलीस हवालदार गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली…मात्र आरोपी शगफ बुबेरे याने तेथून पळ काढला होता…शिवाजी ढवळे यांनी त्वरित एक टीम तयार केली…पोलीस उप निरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार देवेंद्र शिनगारे,पोलीस नाईक कोंडार यांनी घटनास्थळी धाव घेऊन ५ गोवंशीय जनावरे नेणाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली…पोलिसांनी खाकी वर्दी दाखविताच आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली…बेकायदेशीररीत्या स्वतःच्या फायद्याकरीता चोरी करून कत्तलीसाठी पायी चालवीत घेऊन जात असल्याचे सांगितले…यात शगफ बुबेरे २.अजय चंद्रकांत चवर वय २५ वर्षे ३.मनेश अशोक वाघ वय १९ वर्षे व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असून त्यातील शगफ बुबेरे फरार आहे…पोलीस वसावे त्याचा शोध घेत आहेत…सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एक लाख पाच हजार रुपयांची गोवंशीय जनावरे नेरळ येथील गो-शाळेत सुखरूप सोडण्यात आली…आरोपींविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना मा. न्यायालयाने १ दिवसाचा रिमांड दिला आहे… तर अल्पवयीन मुलास नोटीस देण्यात आली आहे…शिवाजी ढवळे यांच्या वारंवार कारवाईमुळे गोवंशीय जनावरे कत्तली करणाऱ्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments