Wednesday, September 18, 2024
HomeUncategorizedपनवेल-रोहा एसटी बस खड्डयात जोरात आदळली... आमटेमचे दोन विद्यार्थी जखमी...उपचार सुरु...

पनवेल-रोहा एसटी बस खड्डयात जोरात आदळली… आमटेमचे दोन विद्यार्थी जखमी…उपचार सुरु नातेवाईक, पालकांनी नागोठणे बसस्थानकात केली गर्दी

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत): 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे नजीक चालती एसटी बस खड्डयात जोरात आदळल्याने प्रवास करणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली…यावेळी संतप्त पालकांनी नागोठणे एसटी बस डेपोत धिंगाणा घातला…दोन तास उलटून सुद्धा या जखमी विद्यार्थ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने पालकांनी नागोठणे बस स्थानकाला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालत या घटनेचा जाब विचारला…गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या पालकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments