Wednesday, September 18, 2024
Homeक्राईम न्यूजराजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर बलात्काराचा गुन्हा...आरोपी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी...

राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर बलात्काराचा गुन्हा…आरोपी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी…

 पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :- 

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील अधिकारी व रावे पेण येथील राजकीय पक्षाच्या युवा नेता योगेश बालकृष्ण पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे…याबाबत सविस्तर घटना अशी की, योगेश बाळकृष्ण पाटील (वय ३१ वर्षे)  रा. रावे (ता. पेण) हा रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आहे…त्याची पेण येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणी सोबत २०१८ साली फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली, ओळखीचे रुपांतरण मैत्रीत झाले ते दोघे एकमेकांना वारंवार भेटत होते आणि भटीचे रूपांतर प्रेमात झाले…आरोपी योगेश पाटील याने पिडितेला लग्नाचे अमिश दाखवून २०१८ पासून वारंवार शारीरिक संबंध ठेवले…. पिडितेने एप्रिल २०२१ साली लग्नासाठी योगेश यांच्याकडे विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.यानंतर एप्रिल २०२२ साली पिडितेने आत्महत्या करण्याचा ही प्रयत्न केला होता. त्यानंतर पिडितेने योगेश याच्याशी बोलने बंद केले होते. तरीही योगेश याने तिला संपर्क करण्यास सुरवात केली. आणि पुन्हा लग्नाचे खोटे आश्वासन देत शरीर सुखाची मागणी करु लागला…दि.३० ऑगस्ट रोजी पीडित तरुणी वाशी येथील व्हि.एल.सी.सी इन्सिटीट्युट येथे गेली असता आरोपी योगेश पाटील याने या तरुणीला वाशी रेल्वे स्टेशन येथे बोलावून शिविगाळ आणि मारहाण केली आणि तिला वाशी येथे सोडून निघुन गेला. आरोपी योगेश पाटील हा आपल्यासोबत लग्न न करता आपला वापर फक्त शरीर सुखासाठी करत आहे हे लक्षात आल्यावर पिडितेने ३० ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली…आरोपी योगेश पाटील यांच्यावर भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ६९, ३५१ (२), ३५२ या कलमां अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सूनविण्यात आली आहे…या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस करीत आहेत…

यावेळी दीपश्रीताईनी शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा व पैशाचा माज आला आहे. यामुळेच त्यांची हिंमत महिलांवर अत्याचार करण्याची झाली आहे, अशा या असुरी वृत्तीला ठेचून काढण्याकरिता शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच राज्यात दररोज मुली व महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांची असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments