एसटी बस स्थानकात मनसेचे अनोखे आंदोलन… एसटी स्थानकात खड्ड्यातून काढली म्हशींची मिरवणूक

0
169

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे): 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध मुद्द्यांवरून मोर्चा काढत असताना दिसतच असते… अनेक घटना ताज्या असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलच्या आंदोलनाने चर्चेत आली आहे…महाड एसटी बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच दुर्गंधी युक्त शौचालयामुळे प्रवासी वर्गात नाराजीचा सूर असताना महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाड एसटी प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता…त्याच अनुषंगाने आज महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महाड एसटी बस स्थानकातील खड्ड्यात चक्क म्हशी फिरवून बस स्थानकातच म्हशी बांधून प्रशासनाचे लक्ष वेधले…आंदोलना दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या सह महाड शहर पोलिसांचे बंदोबस्त तैनात होते…