Wednesday, September 18, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडराष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी,श्रीवर्धन तालुका व शहर यांच्यावतीने श्रावणसरी नृत्य स्पर्धा...

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी,श्रीवर्धन तालुका व शहर यांच्यावतीने श्रावणसरी नृत्य स्पर्धा…

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-  

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी,श्रीवर्धन तालुका व श्रीवर्धन शहर यांच्यावतीने श्रीवर्धन येथील कुलकर्णी हाॅलमध्ये 31 ऑगस्ट २०२४ रोजी श्रावणसरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती…त्यामध्ये तालुक्यातील आठ स्पर्धक संघांनी भाग घेतला होता…स्पर्धेचे परीक्षण काजल पाखुर्डे ( माणगाव) यांनी केले…या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला…स्पर्धेत तालुक्यातील एकूण आठ संघ सहभागी झाले होते.त्यापैकी सौ.निकिता वैद्य यांच्या दिग्दर्शनाखालील नटेश्वर ग्रुपने रागदारीवर आधारित सादर केलेल्या शास्त्रीय नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला…स्वामिनी ग्रुप,बोर्ली पंचतनने दुसरा तर पेशवे आळी ग्रुप,श्रीवर्धनने तिसरा क्रमांक मिळवला…. स्पर्धेचे उत्तम नियोजन

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीवर्धन शहर महिला अध्यक्षा सौ.राजसी मुरकर,जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.प्रविता माने,
तालुका महिला अध्यक्षा सबा फिरफिरे व त्यांच्या सर्व सहकारी भगिनींनी केले होते.कु.युक्ता मुरकर यांनी अत्यंत प्रभावी व नेटके सूत्रसंचालन केले.त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलेल्या गाण्यावर महिलांनी रंगमंचावर उत्स्फूर्तपणे फेर धरला होता.
स्पर्धेमधील सर्व सहभागी ग्रुप्सना सन्मान पत्रे देण्यात आली.विजेत्या ग्रुप्सना गुणानुक्रमे पुढीलप्रमाणे
बक्षिसे देण्यात आली.क्र.1) रु.10,000/- व सन्मानचिन्ह क्रमांक.2)  रु.7000/- व सन्मानचिन्ह  3)
रु.5000/- व सन्मानचिन्ह. तर 3000/- रु.ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके नारी शक्ती ग्रुप, श्रीवर्धन  व जीवनेश्वर कोंड ग्रुप, श्रीवर्धन यांना देण्यात आली… 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments