Wednesday, September 18, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांचा रूटमार्च...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांचा रूटमार्च…

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

                  आगामी येणाऱ्या  गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने रविवार दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या  दरम्यान माणगाव पोलिसांकडून पोलीस ठाणे परेड ग्राऊंड पासुन ते कचेरी रोड,मोर्बा रोड कॉर्नर, शेलार नाकापर्यंत पुढे वळसा घेवून मोर्बा रोड कॉर्नर, मुख्य  बाजारपेठ, वाहतूक पोलिस चौकी आणि एस टी स्टँड परिसर माणगावपर्यंत  रूटमार्च काढण्यात आला…तसेच माणगाव एसटीस्टँड येथे जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम देखील केली… दंगा काबू व  रूटमार्च उपक्रमांकरिता  2 अधिकारी, 22 अंमलदार व माणगाव आरसीपी प्लाटूनचे एकूण 30 अंमलदार हजर होते. दरम्यानचा काळात रूट मार्च वेळी पोलीस पायलट वाहन पुढे राहुन सायरन वाजवत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments