चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):
माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोन उतरवून स्वागत केले जाते…माहेरी येणाऱ्या गौरीचे जोरदार उत्साहात घरोघरी आगमन झाले… गौराईला साडी नेसवायची लगबग सुरू झाली आहे….भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाचे आगमन होते…त्यांच्या पाठोपाठ चौथ्या दिवशी गौराई माहेरी येतात… ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीच्या आगमनाने घरोघरी चैतन्य निर्माण झाले आहे…पाण्याची जागा अथवा मंदीर परिसरातून तेरडा आणि गौरीच्या मुखवट्याची पुजा करुन आणली जाते.घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले. त्यामुळे अखंड वैवाहिक सुख प्राप्तीसाठी महिला ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात, अशी कथा आहे.
आज कोयना प्रकल्पग्रस्त जांब्रूक वावंढळ येथील परंपरागत असलेल्या गौराईचे आगमन झाले आहे.गेली ६५ वर्ष ही परंपरा पाळली जात आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणा मुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्त लोकांनी आपली परंपरा पाळली आहे. ..