रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):
श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते… गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते… गौरीपूजन हा महाराष्ट्रातील खास पारंपारीक सण मानला जातो… याला महालक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते… आज रायगड जिल्ह्यात गौरीचे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले… यावेळी निसर्गातील विविध फुलं पानं आणि पारंपारिक पद्धतीने वरवठणे नागोठणे येथे महिलांनी गौरीचे मोठ्या श्रद्धेने पूजन केले… यावेळी महिलांनी गाणी गाऊन गौरीला मनोभावे पुजले…