उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
गेली अनेक महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील उरण तालुका हा चर्चेचा विषय बनले आहेत…उरणमधील हिट अँड रन चे प्रकरण ताजे असताना पुन्हा एक अपघात झाल्याचे समोर येत आहे…दिघोडे – वेश्वी रस्त्यावर मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मधोमध पडल्याची घटना मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे… या अपघातात चार चाकी गाडीतून बाप्पाच्या दर्शनावरुन येणारे भाविक थोडक्यात बचावले आहेत… यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली…. कंटेनर यार्ड व्यवसायिक, पोलीस, वाहतूक विभाग तसेच संबंधित प्रशासनाने उरण तालुक्यातील खोपटा, कोप्रोली, दास्तान फाटा, दिघोडे आणि गव्हाण फाटा – चिरनेर या रस्त्यावरील अवजड वाहनांची रेलचेल ही गणेशोत्सवात सकाळी ते सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बंद केली नसल्यामुळे गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे… उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहेत… कंटेनर रस्त्याच्या मधोमध पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली…सकाळी कामावर जाणारा कामगार वर्गाचे प्रचंड हाल झाले… यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी वर्गानी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले…