Saturday, November 23, 2024
Homeधार्मिकअंबिके कुटुंबाने गणेशोत्सवातून दिला बालकांच्या शोषणाविरुद्धचा संदेश... गणेशोत्सव हा एक सकारात्मक उत्सव......

अंबिके कुटुंबाने गणेशोत्सवातून दिला बालकांच्या शोषणाविरुद्धचा संदेश… गणेशोत्सव हा एक सकारात्मक उत्सव… गणेशोत्सवातून दिलाय एक अद्वितीय आणि भावनिक संदेश

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथील अंबिके कुटुंबाने या वर्षीच्या गणेशोत्सवातून एक अद्वितीय आणि भावनिक संदेश दिला आहे… त्यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवातून बालकांच्या शोषणाविरुद्धचा संदेश साकारला आहे… तसेच सजावटीमध्ये “चला मोडीत काढूया गतीशून्य, संवेदनाहीन मदनमस्त देह अंतर्गत स्टॉप child abuse” असा संदेश देण्यात आला आहे… या भावनिक देखाव्याद्वारे अंबिके कुटुंबाने समाजाला बालकांच्या शोषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे… आपल्या या अनोख्या उपक्रमाद्वारे गणेशोत्सवाला एक सामाजिक संदेश देण्याचे माध्यम बनवले आहे…
यावेळी राजेंद्र अंबिके यांनी सांगितले की, “आजच्या काळात बालकांचे शोषण ही एक गंभीर समस्या बनली आहे… आपल्याला या समस्येविरुद्ध एकत्र येऊन लढा द्यायचा आहे… गणेशोत्सव हा एक सकारात्मक उत्सव आहे आणि आपण या उत्सवाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो… “देखाव्या सोबत संदेशपर ऑडिओ जोडला आहे… अंबिके कुटुंबाच्या या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी कौतुक केले आहे… सोशल मीडियावरही या देखाव्याची चर्चा रंगली आहे… दरवर्षी अंबिके कुटुंबीय पर्यावरणपूरक व सामाजिक संदेशपर देखावा करून सामाजिक बांधिलकी जोपसत असतात… अनेकांनी या कुटुंबाला त्यांच्या या प्रयत्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments