रायगड शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):
उरण, रायगड, नवी मुंबई, पनवेल, मुंबई मध्ये गौरी मातेसह गौरी गणपती चे वाजत गाजत, फटाक्यांच्या आतीशबाजी करत, पारंपरिक गाण्याचा तालावर फेर धरतं आगमन झाले.गायक, नर्तक, कलाकार, सर्व राजकीय पक्षीय मंत्री, पदाधिकारी, वादक,यांच्या घरी सामाजिक- सांस्कृतिक -शैक्षणिक मूल्ये जपत गौरी गणपतची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.गौरी मातेचे प्राणप्रतिष्ठापणा करण्याची 100वर्षांपूर्वीची जुनी पारंपरिक प्रथा आहे. गौरी मातेला कोळी, आगरी, कुणबी समाजात प्रामुख्याने रायगड कोकणात गौरी मातेला वडे आणि गोडाचा नैवेद्य दाखवण्यात येतो, गौरी मातेचे 3 दिवस मनोभावे पूजन करण्यात येते. पारंपरिक पद्धतीने गौरी मातेचे आगमन होते. पूर्वी गौरी मातेचे चित्र तयार करून रानातून विविध जातीची पाने, फुले आणून, नदीवर जाऊन वाजत गाजत, गाण्यांचा फेर धरतं, फुगडी झिम्मा, खेळत आपल्या घरी प्राणप्रतिष्ठापणा होते. आता मूर्तिच्या रूपात आपण गौरी मातेला बघतो, साज शृंगारात गौरीला सजवले जाते, आकर्षित, सुबक, मूर्ती आपणांस पाहायला मिळते. गौरी जेष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून ओळखण्यात येतात.रायगड, कोकणात रातभर जागरण केले जाते.
आपण यावेळी विशेष मुलाखत घेतल्या असून सगळ्यांनी आपल्या वेदना, सहयोग, भावना, दुःख, आनंद, व्यक्त केल्या. विशेषतः श्रीवर्धन मधल्या दांडा कोळीवाडा येथे दहा दिवस गणपती च्या जागरणाबरोबर गौरी मातेचा जागरण उत्सव पारणें फेडणारा असतो. प्रत्येक घरात कुटुंबातील गौरी मातेचे आगमन झालेले असताना गौरी माते समोर पारंपरिक वेशभूषा करत फेर धरले जाते. याची सांस्कृतिक प्रचिती दांडा कोळीवाडा मध्ये पाहायला मिळाली. प्रत्येकाच्या घरातील गौरी गणपती समोर फेर धरून पारंपरिक गाणी बोलत, ठेका धरत नृत्य करण्यात आले. महिलाचें दिवसभर गौरी मातेला ओवसा (ओटी भरणी)चे कार्यक्रम घेतले गेलेत. सुपात ओवसाच्या (ओटी भरणी ) चां पूजा साहित्य घेऊन गौरी मातेला पूजले गेले. गौरी मातेजवळ फेर धरताना प्रत्येकाच्या घरात गौर अंगात येते आणि ती गौर माता आपले गाऱ्हाणे सगळ्यांसमोर मांडते. आपल्या लेकी मुली यावेळी माहेरी कोकणात येतात, पारंपरिक वेशभूषा परिधान करत दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. आली गौराई आली, माहेरी आली!आली गौराई अंगणी, तिला लिंबलोणं करा अश्या ठेकात गौरी मातेचे आगमन, आवाहन, पूजन केले जाते…