Sunday, November 24, 2024
Homeक्राईम न्यूज25 किलोचा गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीस अटक... पोलादपूर पोलिसांनी सापळा रचत केली...

25 किलोचा गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीस अटक… पोलादपूर पोलिसांनी सापळा रचत केली कारवाई…

 पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-

गांजासारख्या ड्रग्सच्या तरुण पिढी आहारी जात आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड शारीरिक आणि मानसिक नुकसान होत आहे. अमली पदार्थाचे वाढते सेवन ही समाजातील मोठी समस्या आहे. या समस्येला नष्ट करण्यासाठी या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करणे महत्वाचे आहे. त्यांच्यावर कारवाई केली तरच अमली पदार्थाची साखळी नष्ट करता येते. गाजांविक्री टोळी ही अतंत्य छुप्या पध्दतीने कार्यरत असते. त्यांना पोलिसांना अत्यंत शिताफीने पकडावे लागते. रायगडमध्ये ही पोलिसांनी गांजा विक्रेत्यांवर अशीच कारवाई केली आहे. या कारवाईत 25 किलो गांजा जप्त करत आरोपीस पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत….
दिनांक ११/०९/२०२४ रोजी सायंकाळी पोलिस हवालदार 889 जितेंद्र चव्हाण यांना गोपनिय खबर प्राप्त झाली कि , एक ब्रिझा कारमधुन आरोपी गोवा हायवेने पोलादपुरच्या दिशेने जात आहे. यामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू विक्रीसाठी नेण्याची खबर मिळाली.शेवटी पोलादपुर पो. स्टे हद्दीत अन्नपुर्णा हॅाटेल परिसरात काहि इसम गांजा विक्री करीता येणार आहेत असे कळले.

सदर खबर प्राप्त होताच पोउपनि/ नरे व पोहवा/ प्रतिक सावंत, जितु चव्हाण , अक्षय पाटील, पोशि/ मोरेश्वर ओमले, पिंगळे असे पथक तयार करुन सदर परिसरात सापळा लावला . सदर पथकाने मिळालेल्या खबरीनुसार अन्नपुर्णा हॅाटेल परिसरात सापळा रचला. मिळालेल्या खबरीनुसार सुमारे 19:10 वा ब्रिजा कार क्र. 24BH-1593 j उभी असल्याचे दिसुन आले. सदर पथक सदर गाडीजवळ जाताच 1 इसम पळुन गेला व 1 इसमास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. अटक करणाऱ्या इसमाचे नाव हे मंगेश मधुकर भिलारे असून तो साताऱ्यातील महाबळेश्वर येथील रहिवासी आहे.

सदर पथकाने कारची झडती घेतली असता त्यामध्ये 25 किलो गांजा अढळुन आला. दोन पंचाना बोलावुन सदर गांजा , कार व इसमास पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आले….यामध्ये एकूण 7,33,000 किमतीचा म्हणजेच 25 किलो गांजा अंदाजे 8 लाख किमतीची एक ब्रिजा कार हस्तगत करण्यात आली… एकूण मालमत्ता 15,33000 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे…
सदर घटनेचा गुन्हा पोलादपुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे… ताब्यात घेतलेला आरोपी मंगेश भिलारे वय वर्ष 27 यास अटक करण्यात आली आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments