चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कामगिरी जरा देख रे मानसा..अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला…’ सुगरण पक्षाच्या घरट्याच्या विणकामाचे कौशल्य बघूनच निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या रानोमाळी येत आहे. सध्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू असल्याने झाडांच्या उंच उंच शेंड्यांवर, तर पाण्यात डोकावणाऱ्या फांद्यांवर मनमोहक जाळीदार नक्षीकाम केलेले घरटे विणण्यात सुगरण पक्षी सध्या मग्न असलेला आपल्याला पहावयास मिळत आहेत…
सुगरण पक्षी हा साधारण चिमणी एवढा आणि चिमणी सारखा दिसणारा पक्षी असून भर पावसात त्याने घरटे बांधण्यास सुरुवात केली आहे…चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे….खालापूर तालुक्यातील वावंढळ गाव तलाव शेजारी शंकर मंदिर जवळ एका झाडावर त्याने पाच ते सहा घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.हिरव्यागार गवताच्या काडीने विणकाम सुरू आहे.लांब अकराच्या पुंगी सारखी घरे बनवताना दिसत असून विणकाम करताना त्याचा मंजुळ आवाजाने भुरळ घालत आहे. मे ते सप्टेंबर या महिन्या दरम्यान विणीचा हंगाम असतो, असे म्हणतात. सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो. एकावेळी ४ ते १० अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर सुगरण घरट्यांच्या जवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला उकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो. नैसर्गिकरित्या मादी आकृष्ट होते,ती आल्यावर प्रत्येक घरटे तपासून पाहते, असेही त्यांचा अभ्यास करणारे यांचे मत आहे,घरटे पसंत पडल्यावरच ती सुगरण नराशी मादीचे मीलन होते. त्या नंतर मादी उर्वरित घरटे पूर्ण करते. असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र टांगलेले असते. सुगरण पक्ष्याच्या घरट्यात खालच्या बाजूने प्रवेशद्वार ठेवले जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे दिसत आहेत. हे घरटे हिरवे गार गवत यांनी तयार करताना दिसत आहे.अतिशय सुंदर,मजबूत व व्यवस्थित विणलेले आहे. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा सारखा प्रयत्न होताना दिसतो. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते…असा मंजुळ आवाज सर्वत्र घुमत असतो…