Wednesday, December 11, 2024
Homeअपघातसाधना कंपनीतील दुदैवी प्रकाराविरुद्ध ठाकरे गट आक्रमक... प्रोडक्शन मॅनेजर जे. टी कुट्टीवर...

साधना कंपनीतील दुदैवी प्रकाराविरुद्ध ठाकरे गट आक्रमक… प्रोडक्शन मॅनेजर जे. टी कुट्टीवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना समीर शेडगेंची मागणी…

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव ) :-

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात साधना कंपनीत odb 2 या प्लांटमध्ये वेल्डिंगचे काम चालू असताना मोठा स्फोट झाला… या स्फोटने संपूर्ण रोहा हादरले होते… या स्फोटात तिन कामगार ठार झाले…तर तिन जखमी झाले होते…त्यामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे…या घटनेबाबत ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे आक्रमक झाले आहेत… जो अपघात झाला आहे तो दुदैवी आहे… कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा थेट आरोप समीर शेडगे यांनी केला आहे… ज्या प्लांटला अपघात झाला तो प्लांट लगेचच प्रोडक्शन मॅनेजर जे. टी कुट्टी यांनी सुरू केला..त्यामुळे प्रशासनाला कोणतीही माणुसकी राहिली नाही का ? असा थेट सवाल समीर शेडगे यांनी उपस्थित केला…सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना काम सुरू केले… कंपनी लोकांच्या जीवाशी खेळत आहे..त्यामुळे जे. टी कुट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करा…अशी मागणी तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी दिला आहे…गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments