महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड तालुक्यातील पिंपळवाडी वांद्रेकोंड येथील एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे… याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 13 सप्टेंबर रोजी फिर्यादी महिला कल्याण येथून आपल्या गावी पिंपळवाडी वांद्रेकोंड येथे गावातील दत्त मंदिराच्या बांधकामाबाबत घेण्यात आलेल्या गावकीच्या मिटींगला आली होती… यावेळी फिर्यादी यांचे पती व मुलाला दोघा आरोपींनी गावच्या मीटिंगमध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली… त्यावेळी फिर्यादी महिला भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या… याचवेळेस दोघा आरोपींनी महिलेला धक्काबुक्की करून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले… तू आमच्यामध्ये आलीस तर तुला बघून घेऊ असे बोलून ढकलून दिले… आरोपी सुनील लक्ष्मण पवार वय वर्ष 30, व अक्षय गणेश पवार वय वर्ष 32 दोघेही राहणार वांद्रे कोंड यांच्या विरोधात विनयभंग व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे… महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार निलीमा गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.