महाड शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात कोंडीवते येथे स्वराज्य निवारा वृद्धाश्रम आहे… या वृद्धाश्रमात 11 अकरा दिवसांच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे… स्वराज्य निवारा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत तांबे यांनी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली असून गणपती बाप्पाला देवीचे प्रभावळ करण्यात आलेली आहे… यावेळी
संस्थापक अध्यक्ष अनिकेत तांबे यांनी शिवसत्ता टाइम्स न्युज चॅनेलला विशेष मुलाखत दिली… शिवसत्ताचे मुंबई प्रतिनिधी शेखर म्हात्रे यांनी अनिकेत तांबे यांचा विश्व सुखाचा विचार लोकांसमोर आणलाय… अनिकेत तांबे यांना अगदी लहानपणापासून सामाजिक कार्य करण्याची आवड आहे… त्यातूनच वृद्धाश्रमाची निर्मिती झाली… प्रत्येक धार्मिक, राष्ट्रीय सण, जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस असे उत्सव मोठया आनंदाने वृद्धाश्रमात साजरे होतात… महाडचे मूळ रहिवाशी असलेले अनिकेत तांबे डॉक्टरही आहेत… अनिकेत तांबे यांच्या स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात रायगड, मुंबई, पुणे इथले रस्त्यावर झोपणारे, घरातून वैयक्तिक कारणामुळे बाहेर काढलेले… स्वतःहून घर सोडून निघून आलेले… काही वेडसर… तर अगदी चांगल्या व्यक्तीही आहेत… अनिकेत तांबे यांच्या सोबत श्री.सकपाळ, सुषमा झांजे या ताई वृद्धाश्रमाची काळजी घेतात… चार किलोमीटर पायपीट करून त्या वृद्धाश्रमात सेवेसाठी येतात…
महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांची मदत या वृद्धाश्रमाला होत असते… सामाजिक-राजकीय मंडळी आपल्या वाढदिवसाला मदत देतात… मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे… या योजनेचा आश्रमात राहणाऱ्या गरजूंकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना फायदा होत नाही… तरी सरकारने नियमात बदल करून आश्रमातील महिलांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी अनिकेत तांबे यांची आहे…
बाईट – स्वराज्य निवारा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत तांबे
-उपसहकार्य सौं.सुष्मा झांजे
-वृद्धाश्रमात असलेले पीडित गरजू