उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-
वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, फुंडे मधील आर्यन मोडखरकर (F.Y.B.Sc.IT) या विद्यार्थ्याने आपल्या जबरदस्त जलतरण कौशल्याने आणि मेहनतीने महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये चार स्पर्धा करत तीन स्पर्धामध्ये बक्षीस प्राप्त करून, विद्यालयासाठी चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिली आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत ‘प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स’, यांच्यामाध्यमातून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या… डोंबिवली, पलावा सिटी मधील जलतरण तलावामध्ये या स्पर्धा पार पडल्या… आर्यनने केलेल्या कामगिरीबद्दल प्राध्यापकवर्गातून त्याचे कौतुक केले जात आहे…
आर्यन मोडखरकर याने २०१६ पासून जलतरण स्पर्धा करण्यास सुरुवात केली…यांनंतर त्याने अनेक पारितोषिके मिळवली आहेत… आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याने देशाचे नेतृत्व करत तीन सुवर्ण पदक मिळवून आपल्या जलतरण खेळामधील कामगिरी सर्वांना दाखवून दिली आहे… तर अंतर शालेय स्पर्धेमधूनही राष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्याचे नेतृत्व केले आहे… सध्या तो वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, फुंडे या महाविद्यालयात (F.Y.B.Sc.IT) प्रथम वर्षात शिकत असून, यावर्षी अंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन, पहिल्याच वर्षी महाविद्यालयाला चॅम्पिन ट्रॉफी मिळवून दिली आहे… डोंबिवली येथील पलावा सिटी मधील जलतरण तालावामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये आर्यनने सुरूवातीपासूनच चुरस निर्माण केली होती… त्याच्या जलद आणि सुसंगत पोहण्याच्या तंत्रामुळे त्याने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत दोन स्पर्धामध्ये पहिल्या स्थानावर आपला हक्क प्रस्थापित केला… तर एका स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवला… तर त्याच्या कामागिरीमुळे मिळालेल्या गुणानुसार महाविद्याल्याला तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी मिळाली आहे… त्याच्या या कामगिरीने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले असून, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांच्याकडून त्याचे अभिनंदन होत आहे… आर्यन वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, फुंडे मधील जलतरण स्पर्धेसाठी चॅम्पियन ट्रॉफी मिळवणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे… आर्यनचे वडील म्हणाले, “त्याच्या सातत्यपूर्ण सराव आणि कष्ट तसेच त्याचे प्रशिक्षक हितेश भोईर यांनी त्याच्यावर घेतलेली मेहनत यामुळेच आज त्याने हे यश मिळवले आहे… तो आगामी स्पर्धांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे” आर्यनच्या या यशाचे कौतुक महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने केले आहे….